facebook pixel
chevron_right Top
transparent
पनवेल-पेण, दिवा-वसई मेमू सेवा आजपासून-Maharashtra Times
खास प्रतिनिधी, मुंबई उपनगरांचा विस्तार होतानाच रेल्वे प्रवासी संख्याही वाढत गेल्याने सर्वच मार्गांवर ताण वाढला आहे. मात्र दिवा-वसई आणि दिवा-पनवेल-रोहापर्यंतच्या प्रवाशांना रेल्वेच्या विद्युतीकरण प्रकल्पाने मोठा आधार मिळणार आहे. आज, रविवारपासून पेण ते पनवेल मार्गावर डिझेलऐवजी लोकल आणि मेलच्या डब्यांचा संयोग साधलेल्या मेमू डब्यांची सेवा सुरू होणार आहे. खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात या सेवेसही हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. मध्य रेल्वेची हद्द रोहापर्यंत असून त्यापुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App