facebook pixel
chevron_right Business
transparent
मुहूर्तावर गुंतवणूकदारांची १.१८ लाख कोटींची कमाई-Maharashtra Times
वृत्तसंस्था, मुंबई लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये बुधवारी संध्याकाळी एक तास विशेष मुहूर्तावर व्यवहार करण्यात आले. संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या कालावधीत झालेल्या या मुहूर्त कालावधीत निर्देशांकाने २४६ अंकांची उसळी घेत ३५ हजारांचा टप्पा पार केला. या तासाभरात गुंतवणूकदारांच्या समभागांचे मूल्य १.१८ लाख कोटी रुपयांनी वाढले. लक्ष्मीपूजन व बळीप्रतिपदेनिमित्त बुधवारी व गुरुवारी शेअर बाजारांना सुटी आहे. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष मुहूर्तावर व्यवहार करण्याची प्रथा असल्याने बुधवारी संध्याकाळी एका तासासाठी शेअर बाजार उघडण्यात आला. हिंदू संवत्सर २०७५च्या आरंभाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App