facebook pixel
chevron_right Entertainment
transparent
मंगेश कदम, लीना भागवत म्हणताहेत 'चल तुझी सीट पक्की'
मराठी नाटय़वर्तुळात नवे विषय आणि नवे प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच नवा प्रयोग असलेलं खुसखुशीत नवं नाटक रसिकांच्या भेटीला आलंय. या नाटकाचं नाव आहे 'चल तुझी सीट पक्की.' 'नाटक मंडळी' प्रस्तुत या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन दीक्षित यांनी केलं असून नाटकात अभिनेत्री लीना भागवत, मंगेश कदम आणि शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'चल तुझी सीट पक्की' या नाटकाचा आणि कलाकारांच्या भूमिकांविषयी अभिनेत्री लीना भागवत म्हणाल्या, हे नाटक नवरा-बायकोच्या नात्यावर एका वेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारं आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App