facebook pixel
chevron_right Top
transparent
राममंदिराच्या बांधकामात काँग्रेसचा सर्वात मोठा अडथळा
अयोध्येत राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी केला असून, 'मते गोळा करण्यासाठी' देशभरातील धार्मिक ठिकाणांना भेटी देण्याऐवजी राममंदिराच्या मुद्दय़ावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केले. काँग्रेसचे कार्यकर्ते राममंदिर व रामसेतू यांना विरोध करत असून गोहत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे, असाही आरोप राज्याचे ऊर्जामंत्री असलेले शर्मा यांनी केला. भाजप या मुद्दय़ावर कायदा का करत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे शर्मा म्हणाले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App