facebook pixel
chevron_right Top
transparent
बंगळुरूत बांधकामाधीन इमारत कोसळली, एक ठार
सामना प्रतिनिधी । बंगळुरू कर्नाटकाची राजधानी बंगळूरूत शनिवारी एक बांधकामाधीन इमारत कोसळली. यात अपघातात एका मजूराचा मृत्यू झाला असून एका जखमी मजूराला बाहेर काढण्यात यश आले आहे. शनिवारी सायंकाळी थिगराजनगरमध्ये एका बांधकामाधीन इमारत कोसळली. या ढिगार्‍याखाली अडकून मजूराचा मृत्यू झाला. तर एका मजूराला यशस्वीरित्या बाहेर काढून जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या इमारतीच्या शेजारील आणखीण एक इमारत कोसळली. इमारत बांधताना कुठल्याही नियमांचे पालन न केल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App