facebook pixel
chevron_right Top
transparent
दानवेंच्या जळगाव, धुळे दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचाच राडा
खान्देशच्या दौऱ्यावर असलेल्या दानवे यांच्यासमोर जळगावमध्ये कार्यकर्त्यांनी खडसेंना मंत्रिमंडळात घेण्याबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावर खुलासा करत खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांना नक्कीच स्थान दिले जाईल असे सांगून दानवे यांनी वेळ मारून नेली. दुसरीकडे धुळ्यात भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला. धुळे शहरातील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात भर सभेत गदारोळ झाला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App