facebook pixel
chevron_right Top
transparent
दिल्ली-कंदाहार विमान हायजॅकच्या सूचनेने घबराट-Maharashtra Times
दिल्लीहून कंदाहारला जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाल्याचा अलर्ट आला आणि एकच खळबळ आणि घबराट पसरली. पण प्रत्यक्षात घडलं असं होतं की उड्डाणाच्या वेळी वैमानिकाने चुकून 'हायजॅक बटण' दाबलं होतं! सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास केल्यानंतर हे विमान रवाना झाले. हा सर्व थरार सुमारे दोन तास सुरू होता. प्रवासी खूप घाबरलेले होते. हायजॅक बटण दाबल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा अलर्ट झाल्या. दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान विमानाकडे धावले. एनएसजी कमांडोंनी विमानाला घेरले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App