facebook pixel
chevron_right Sports
transparent
Pro Kabaddi Season 6 : गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सूर गवसला, बंगालवर मात
प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात मुंबईच्या NSCI मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सवर ५०-२३ ने मात केली आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पाटण्याने सामन्यात बाजी मारली. या विजयासह गतविजेत्या पाटणा पायरेट्सच्या गुणतालिकेतील स्थानात फारसा फरक पडणार नसला तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान कायम राहणार आहे. पाटण्याकडून चढाईत प्रदीप आणि दिपक नरवालने चढाईत अनुक्रमे १३ व ११ गुणांची कमाई करत 'सुपर १०' ची कमाई केली. सुरुवातीच्या सत्रात पाटणा आणि बंगाल हे दोन्ही संघ एकमेकांना मोठी आघाडी घेऊ देत नव्हते.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App