facebook pixel
chevron_right Top
transparent
जीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत मागे पडला
निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठी खीळ बसली, असे विधान रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. ते शुक्रवारी कॅलिफोर्निया विद्यापीठातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजन यांनी जीएसटी आणि नोटाबंदीच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केले. राजन यांनी म्हटले की, निश्चलनीकरण आणि जीएसटी या एकापाठोपाठ बसलेल्या फटक्यांनी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले. भारतीय अर्थव्यवस्थेचा सध्याचा ७ टक्के विकास दर हा पुरेसा नाही. नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App