facebook pixel
chevron_right Top
transparent
शिर्डी: देवदर्शनाहून परतताना अपघात; वसईचे ५ ठार-Maharashtra Times
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरजवळ कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पाच जण ठार झाले. हे सर्व जण वसईचे रहिवासी होते. ते शिर्डी येथून देवदर्शनाहून परतत होते, असे सांगण्यात येत आहे. सिन्नरजवळील पांगरी गाव येथे कार आणि खासगी बस समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात वसईचे पाच भाविक ठार झाले आहेत. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. ते सर्व शिर्डी येथून देवदर्शनाहून परतत होते. मृत भाविक आणि जखमींची नावे अद्याप कळू शकली नाहीत. या अपघातामुळं काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App