facebook pixel
chevron_right Sports
transparent
'बजरंगा'ची कमाल, जागतिक क्रमवारीत अव्वल
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत कमाल केली आहे. या वर्षात पाच पदके जिंकणाऱ्या २४ वर्षीय बजरंग पुनिया यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत ९६ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर असेल्या कुस्तीपटूपेक्षा बजरंग ३० गुणांच्या अंतराने पुढे आहे. क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर ६६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रशियाचा अखमद चाकेइव ६२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बजरंगसाठी हा हंगाम शानदार राहिला आहे. तो बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू राहिलाय.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App