facebook pixel
chevron_right Sports
transparent
खेलरत्न पुरस्कार नाकारण्यात आलेला 'हा' खेळाडू ठरला जागतिक क्रमवारीत नंबर १
भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. बजरंगने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची किमया केली आहे. २४ वर्षांच्या बजरंग पुनियाने या हंगामात पाच पदकांवर नाव कोरले होते. यामध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकाचा समावेश आहे. या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीमुळे बजरंगने 'यूडब्ल्यूडब्ल्यू'च्या क्रमवारीत ९६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असेल्या कुस्तीपटूपेक्षा बजरंग ३० गुणांच्या अंतराने पुढे आहे. क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर ६६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App