facebook pixel
chevron_right Top
transparent
रायपूरमध्ये राममंदिर बनले, आता रामजन्मभूमीवरही बनेल : योगी आदित्यनाथ यांचा विश्वास
सामना ऑनलाईन । रायपूर. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शनिवारी अखेरचा दिवस आहे. त्यामुळे शनिवारी सर्व पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचारसभा घेतल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ शनिवारी प्रचारासाठी रायपूरमध्ये आले होते. या सभेत त्यांनी राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला. रायपूर या भगवान श्रीरामाच्या आजोळी रामंदिर उभारले आहे. आता लवकरच श्रीरामाच्या जन्मभूमीवर अयोध्येत राममंदिर निर्माणाच्या कार्याला सुरुवात होईल असा विश्वास योगी यांनी व्यक्त केला. रायपूरमध्ये राममंदिर उभारल्याबाबत त्यांनी जनतेचे अभिनंदन केले. तसेच काँग्रेस राजकीय फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळत असल्याचा आरोपही योगी यांनी केला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App