facebook pixel
chevron_right Sports
transparent
हरमनप्रीत कौरच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने, विंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळत असताना हरमनप्रीतने शतक झळकावलं. टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. हरमनप्रीतने 51 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. हरमनप्रीतच्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. मुंबईकर जेमिया रॉर्ड्रीग्जने हरमनप्रीतला 59 धावांची अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App