facebook pixel
chevron_right Top
transparent
'या' गावात सूर्यास्ताआधी महिलांनी नाईटी घातल्यास २ हजार रुपये दंड
भारतात लोकशाही पद्धतीने कारभार चालत असला तरी काही गावखेडयात अजूनही लोकशाही मुल्ये पूर्णपणे रुजलेली नाहीत. तिथे मनमानी, हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. आंध्रप्रदेशच्या एका गावातील असेच मनमानी कारभाराचे एक प्रकरण समोर आले आहे. आंध्रच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात महिला नाइटी पोषाख परिधान करु शकत नाहीत. या गावात दिवसा नाइटी घालण्यावर महिलांना बंदी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. गावातील ज्येष्ठांनी हा आदेश दिला आहे. नाइटी वस्त्र फक्त रात्री घालण्यासाठीच असते असे त्यांचे मत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App