facebook pixel
chevron_right Top
transparent
रणवीर सिंगला भेटायचंय 'या' मराठी अभिनेत्रीला!
रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना होत असेल. पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?. आणि तेही एका मराठी अभिनेत्रीला. मग ते खासच म्हणायला हवं. अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती आहे. तेजस्विनीचा मित्र अभिनेता सिध्दार्थ जाधवला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सिंबाच्या सेटवरून सिध्दार्थने त्याची 'बंड्या' अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचं सरप्राइज दिलं. या मेसेजमध्ये रणवीरने चक्क तिला भेटायची इच्छा व्यक्त केली. याविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, 'सध्या मी नि:शब्द झालीय.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App