facebook pixel
chevron_right Top
transparent
टिपू जयंतीवरुन राजकारण! कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी टाळला कार्यक्रम
प्रकृतीचे कारण देत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी शनिवारी टिपू जयंतीचा कार्यक्रम टाळला. खराब प्रकृतीमुळे मुख्यमंत्र्यांना टिपू जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होता आलेले नाही. त्याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्नाटक सरकारकडून संपूर्ण राज्यभरात हजरत टिपू जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. टिपू सुलतान यांची प्रशासनातील दूरदृष्टी आणि सतत नाविन्याचा शोध घेण्याचा ध्यास खरोखरच कौतुकास्पद होता असे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले. डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन आपण विश्रांती घेत आहोत. त्याचा वेगळ अर्थ काढणे अयोग्य ठरेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App