facebook pixel
chevron_right Top
transparent
chhattisgarh: काँग्रेस कधी छत्तीसगडचं भलं करू शकत नाही: शहा-Maharashtra Times
'ज्या पक्षाला नक्षलवाद्यांमध्ये क्रांतिकारक दिसतात. नक्षलवाद हा क्रांतीचं माध्यम वाटतो, तो पक्ष कधीच छत्तीसगडचं भलं करू शकत नाही,' अशा शब्दांत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केला. गरिबांच्या घरात गॅसचा पुरवठा, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना वाढीव हमीभाव यातच आम्हाला क्रांती दिसते,' असंही ते म्हणाले. शहा यांच्या उपस्थितीत आज छत्तीसगड भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'नक्षलवादी हे क्रांती करण्यासाठी निघाले आहेत. आपण त्यांना थोपवू शकत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राज बब्बर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App