facebook pixel
chevron_right Top
transparent
पंजाब नॅशनल बँकेला आणखी एक चुना, यावेळी 268 कोटी बुडाले
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली तब्बल 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे प्रकाशझोतात आलेली पंजाब नॅशनल बँक आता पुन्हा एकदा एका घोटाळ्यात अडकली आहे. बँकेच्या लंडन येथील शाखेला तब्बल 37 मिलियन डॉलर म्हणजे 268 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा करणाऱ्यांमध्ये 5 हिंदुस्थानी कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांनी करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा आरोपही पीएबीने केला आहे. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पीएनबीची सहाय्यक बँक असलेल्या पीएनबी इंटरनॅशनलच्या इंग्लंडमध्ये सात शाखा आहेत. या शाखांमधून आरोपी कंपन्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा आरोप बँकेने केला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App