facebook pixel
chevron_right Top
transparent
वाघिणाला मारल्याचं दुःख आहे पण दुसरा उपाय नव्हता
नागपूर, 10 नोव्हेंबर : अवनी वाघिणीच्या हत्येनंतर वनविभाग आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकेची झोड उठली असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. सुधीर मुनगंटीवार हे तर खरे वाघमित्र आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं वक्तव्य गडकरींनी केलं आहे. नागपूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुनगंटीवारांमुळेच वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अवनी वाघिण प्रकरणात त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. वाघिणाच्या मृत्यूचं राजकारण होतं असल्यानं अति दुःख होत आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App