facebook pixel
chevron_right Top
transparent
Sanjay Dutt: संजूबाबाचा दिवाळीत शिमगा; छायाचित्रकारांना शिवीगाळ-Maharashtra Times
दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टीत बेधुंद झालेल्या अभिनेता संजय दत्त यानं त्याच्या घराबाहेर जमलेल्या छायाचित्रकारांना अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळं संजय दत्तवर टीकेचा भडिमार होत आहे. दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडमधील अन्य कलाकारांप्रमाणेच संजय दत्तनंही त्याच्या घरी पार्टी ठेवली होती. अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. त्यामुळं साहजिकच त्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकारही तिथं उपस्थित होते. ते कलाकारांचे फोटो टिपण्याचा प्रयत्न करत होते. पार्टी संपल्यानंतर सर्वप्रथम संजय स्वत: बाहेर आला आणि छायाचित्रकारांना पोझ देऊ लागला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App