facebook pixel
chevron_right Top
transparent
टाटा स्टीलमध्ये गोळीबार, माजी अधिकाऱ्याने सिनियर मॅनेजरची केली हत्या
टाटा स्टीलच्या माजी अधिकाऱ्याने सिनियर मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणातील फरीदाबादमध्ये कंपनीच्या आवारात हा प्रकार घडला. आरोपीला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मॅनेजर अरींदम पाल त्यांच्या केबिनमध्ये आराम करत असताना आरोपी विश्वास पांडे थेट त्यांच्या केबिनमध्ये घुसला. त्याने पॉईंट ब्लॅक रिव्हॉल्वव्हर काढली व पाल यांच्यावर पाच गोळया झाडल्या. रक्ताच्या थारोळयात खाली कोसळलेल्या पाल यांचा जागीच मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. इंजिनिअरींगमध्ये पदवीधर असलेला विश्वास पांडे टाटा स्टीलमध्ये मॅनेजर होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App