facebook pixel
chevron_right Top
transparent
३७ गुन्हे; आठ अटकेत-Maharashtra Times
खास प्रतिनिधी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने घातलेली वेळेची मर्यादा झुगारून रात्री १०नंतर फटाके फोडणाऱ्या अनेकांवर मुंबईत ठिकठिकाणी आत्तापर्यंत ३७ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटकही केली आहे. काही ठिकाणी थेट गुन्हा दाखल न करता पोलिसांनी समज आणि दंड आकारून सोडून दिल्याचेही सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करतानाच, रात्री ८ ते १०दरम्यानच फटाके फोडण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही मुंबईत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच वेळेचे बंधन जुगारून फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App