facebook pixel
chevron_right Top
transparent
काशीनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक
मुंबईत पुन्हा एकदा मराठी सिनेमांवरून मनसेचा दणका पाहायला मिळाला आहे. मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसेने पुन्हा आक्रमक झाली आहे. काशिनाथ घाणेकर या मराठी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्राईम टाईम शो मिळवा यासाठी मनसेने कल्याणमध्ये हे आंदोलन केलं आहे. जर घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम शो नाही मिळाला तर आम्ही मल्टिप्लेक्स फोडून टाकू असा धमकीवजा इशारा मनसेने दिला आहे. मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी हा इशारा दिला आहे. गेल्या शुकरवारी बॉक्स ऑफिसवर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा हिंदी सिनेमा आणि 'डॉ. काशीनाथ घाणेकर' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App