facebook pixel
chevron_right Top
transparent
पुन्हा एकदा जालन्याचा खासदार मीच होणार
पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्याचबरोबर युती होऊन पुन्हा मीच जालन्याचा खासदार होणार असल्याचा विश्वास दानवे यांनी बोलून दाखवला आहे. ते जालन्यात आयोजित एका दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्याचबरोबर मी सगळ्या मतदार संघात फिरत असून प्रत्येक शिवसेना कार्यकर्त्याची इच्छा ही युती व्हावी अशी असल्याचं दानवे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे यावर आता शिवसेनाकाय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यात जालना लोकसभा मतदार संघावर शिवसेनेने दावा केला आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App