facebook pixel
chevron_right Sports
transparent
मिताली राजची शतकी खेळी वाया, तिसऱ्या वन-डेत भारतीय महिला पराभूत
श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या महिलांनी ३ गडी राखत भारताने दिलेलं २५४ धावांचं आव्हान पूर्ण केलं. मात्र ३ सामन्यांच्या मालिका भारतीय महिलांनी याआधीच २-१ अशी जिंकली आहे. अखेरच्या वन-डे सामन्यात कर्णधार मिताली राजने आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम खेळी करत नाबाद १२५ धावा पटकावल्या. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारतीय महिलांना पहिलाच धक्का बसला. सलामीवीर जेमिया रॉड्रीग्ज भोपळाही न फोडता माघारी परतली. यानंतर स्मृती मंधाना आणि मिताली राजने दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App