facebook pixel
chevron_right Top
transparent
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन-Maharashtra Times
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.पुण्याच्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी कोल्हापुरात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कुस्ती विश्वावर शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी निर्माण केली होती. देशभरातील मल्ल इथे कुस्तीसाठी येत होते. त्यामुळे जवळच्याच पुनवत गावातील गणपतराव आंदळकरांनीही कोल्हापुरात येणे स्वाभाविक होते. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App