facebook pixel
chevron_right Top
transparent
२०४७ मध्ये धर्माच्या आधारावर पुन्हा देशाची फाळणी होईल: केंद्रीय मंत्री
देशात हिंदुंची लोकसंख्येची टक्केवारी घसरत गेली तर देशात सामाजिक समरसता राहणारच नाही. हीच परिस्थिती कायम राहिली तर देशात पुन्हा एकदा फाळणीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. यासाठी देशात लोकसंख्येवर नियंत्रणासाठी कायद्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे माध्यमांशी संवाद साधताना गिरीराज सिंह म्हणाले की, १९४७ मध्ये ३३ कोटी लोकसंख्या होती. आज घोषित लोकसंख्या ही १२५ कोटी, अघोषित १३६-१४१ कोटी आहे. देशात आज ५४ जिल्ह्यात हिंदुंची लोकसंख्या टक्केवारी घसरली आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App