facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत सरकार सुरळीत चालवण्यासाठी भाजपचा खटाटोप
सामना प्रतिनिधी । पणजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना थोड़े दिवस आराम देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुख्यमंत्री विश्रांती घेणार असल्याने सरकार सुरळीत चालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी भाजपने चाचपणी सुरु केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार तीन निरीक्षक रविवारी दुपारी गोव्यात पोहचले असून बैठका सुरू झाल्या आहेत. पणजीतील हॉटेल फिदाल्गोमध्ये भाजप निरीक्षकांनी सुरुवातीला भाजप आमदारांशी वन टू वन चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेतली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App