facebook pixel
chevron_right Technology
transparent
जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. यावेळी मुकेश अंबानींनी जिओचे ग्राहक वाढवणार असल्याचं सांगितलं. या कारणासाठी जिओनं आणखी ऑफर आणल्या. आता एयरटेलही जिओसारख्याच ऑफर घेऊन आली आहे. एयरटेलनं 419 रुपयांचा नवा प्लान लॉन्च केला आहे. एयरटेलच्या नव्या प्लानवर सर्वाधिक 105 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी 75 दिवसांची आहे. ग्राहकाला दिवसाला 1.4 जीबी डेटा वापरता येणार आहे. एयरटेलच्या वेबसाईट आणि अॅपवर ही ऑफर मिळणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App