facebook pixel
chevron_right Top
transparent
भारतीय वायुसेना बनवणार आंध्रात हवाई तळ-Maharashtra Times
चीनच्या वाढत्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने आंध्र प्रदेशात लष्करी हवाई तळ तयार करण्याची रणनिती आखली आहे. देशाची पूर्वेकडची सीमा आणखी मजबूत करण्यासाठी आणि येथील चीनच्या वाढत्या महत्त्वामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात प्रकाशम जिल्ह्यात डोनाकोंडा येथे एक मोठं हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आंध्र सरकारसमोर केंद्राने काही योजनाही ठेवल्या आहेत. यात अनंतपूर जिल्ह्यात ड्रोन बनवणारं एक युनिट, अमरावतीत एक सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहेत. यासोबतच राजमुंद्री आणि विजयवाडा विमानतळांशी जोडलेल्याही काही योजना आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App