facebook pixel
chevron_right Sports
transparent
आशिया चषकात कर्णधार रोहित शर्माला कॅप्टन कूलची साथ
साहजिकच फलंदाज आणि कर्णधार या नात्याने रोहित शर्मावर दुहेरी दडपण आहे. रोहितच्या सुदैवाने त्याच्या हाताशी महेंद्रसिंग धोनीसारखा दिग्गज शिलेदार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत वाढलेल्या जबाबदारीचा ताण रोहितवर येऊ नये म्हणून धोनी प्रयत्न करत आहे. भारतीय संघाच्या नेट्समध्ये प्रत्येक फलंदाजावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला सूचना करण्याची जबाबदारी धोनीने स्वीकारली आहे. भारताचा आशिया चषकातील सलामीचा सामना नवख्या हाँगकाँगशी होत असला तरी त्यानंतर लगेचच पाकिस्तानशी टक्कर होणार आहे. धोनीने जबाबदारी घेत खेळाडूंना टिप्स देणंही सुरु केलं आहे. नेट्समध्ये तो खेळाडूंना टिप्स देताना दिसून आला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App