facebook pixel
chevron_right Top
transparent
धक्कादायक खुलासा : सांगलीत वर्षभरापासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा!
सांगलीतल्या गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. चौगुले हॉस्पिटलमधल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित डॉक्टर रुपाली चौगुले आणि पती विजयकुमार चौगुले हे शासकीय सेवेत असल्याचं समोर आलंय. मागील एक वर्षांपासून ते इथं विनापरवाना गर्भपात करत होते. या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं आणि दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. तसंच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी 7 गर्भपात केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यागर्भपात प्रकरणाच्या तपासासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App