facebook pixel
chevron_right Top
transparent
निरुपमांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी : सूत्र
मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस नेत्यांनी मुंबईत भेट घेतली. यामध्ये आमदार नसिम खान, अमिन पटेल, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या इतर नेत्यांचा समावेश होता. जनार्दन चांदूरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, नवा अध्यक्ष कोण याबाबत निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असं चांदूरकर म्हणाले. दरम्यान, संजय निरुपम यांचा मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App