facebook pixel
chevron_right Top
transparent
पत्नीचीच नग्न छायाचित्रे 'तो' व्हायरल करणार होता..!
मोबाईलवर काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नवऱ्यानेच त्याच्या बायकोला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा नवरा तीला गोव्याला घेऊन गेला आणि एका हॉटेलमध्ये त्याने तीच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. एवढ्यावच तो थांबला नाही, तर ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने त्याने तीचे नग्न फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याचीही धमकी दिली.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App