facebook pixel
chevron_right Top
transparent
इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू-Maharashtra Times
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे बंधाऱ्यावर असलेली विद्युत मोटार सुरु करताना शॉक लागून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. आप्पा विठ्ठल ढोबळे (वय ४५) व चैतन्य आप्पा ढोबळे (वय १५) या बाप-लेकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सकाळी ११ च्या सुमारास दोघेही मोटार सुरु करण्यासाठी गेले. मोटार सुरु करत असतानाच वडील आप्पा ढोबळे यांना जोरदार शॉक लागला. ते पाहून त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या मुलालाही शॉक बसला आणि यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यु झाला. सध्या या परिसरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App