facebook pixel
chevron_right Top
transparent
रिलायन्सविरोधात मोदी सरकार कोर्टात जाणार !
ओएनजीसी-रिलायन्स गॅस चोरीप्रकरणी सरकार रिलायन्सविरोधात पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. विधी मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. ओएनजीसीच्या गॅस क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे कथितरित्या गॅस घेतल्याप्रकरणी सरकारची रिलायन्सकडे १.५० अब्ज डॉलरची मागणी करणारी याचिका मध्यस्थता न्यायालयाने फेटाळली होती. पेट्रोलिय मंत्रालयाने याप्रकरणी विधी मंत्रालयाला सल्ला मागितला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या मते, मध्यस्थता न्यायालयाने बहुमताने दिलेला निर्णय उत्पादन भागिदारी कराराच्या नियम आणि अटींचे उल्लंघन आहे. यामध्ये आवश्यक कारणांची कमतरता असून हा निर्णय सार्वजनिक हितासाठी प्रतिकूल आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App