facebook pixel
chevron_right Top
transparent
लोणचं बनवण्याच्या टाकीत पडून बाप-लेकाचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी लोणचं तयार करण्याच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील दौलत नगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी अनधिकृतपणे लोणचे तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्याचा मालक सकाळी त्याची पत्नी आणि मुलासोबत त्याठिकाणी आला होता. या कारखान्यात भाज्यांवर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी एक मोठी टाकी तयार करण्यात आली होती. वडील आणि मुलगा टाकीमध्ये पाहत असताना त्याठिकाणी पसरलेल्या रसायनांमुळे त्यांचा पाय घसरला आणि ते टाकीत पडले. हा प्रकार बघून मालकाच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App