facebook pixel
chevron_right Top
transparent
रिलायन्सविरोधात कोर्टात जाणार केंद्र सरकार!-Maharashtra Times
ओएनजीसी-रिलायन्स गॅसचोरी प्रकरणी केंद्र सरकार रिलायन्सविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. विधी मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय मध्यस्थी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मंजुरी दिली आहे. ओएनजीसीच्या गॅस क्षेत्रातून रिलायन्सने गॅस काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंद्राने रिलायन्सकडून १.५० अब्ज डॉलर्सची मागणी केली होती, ती या आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली. पेट्रोलियम मंत्रालयाने यासंदर्भात विधी मंत्रालयाकडून सल्ला मागितला होता. आंतरराष्ट्रीय कोर्टाने बहुमताने दिलेला निर्णय उत्पादन भागीदारी नियमावलीच्या शर्तींच्या भंग करणारा तसेच सार्वजनिक हिताच्या विरोधातला असल्याचे विधी मंत्रालयाचे मत आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलैमध्ये हा निर्णय दिला होता.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App