facebook pixel
chevron_right Top
transparent
'मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार'
दिनेश दुखंडे, प्रतिनधी, झी मीडिया, पणजी : मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे गोव्यातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. तसंच इतर मंत्रीही स्वत:च्या खात्याचा कारभार पाहण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना एम्समध्ये दाखल केल्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला होता. तसंच नेतृत्व बदलाचीही चर्चा रंगली होती. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते रामलाल, संघटन मंत्री विजय पुराणिक, गोव्यात आले आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App