facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच?
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच राहणार असल्याची माहिती गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यानी दिलीय. पर्रीकर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असून गेले काही महिने ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. त्यामुळे पर्रीकरांच्याच इच्छेनुसार त्यांच्या जागी भाजपाकडून पर्यायी नेतृत्व देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. मात्र त्याऐवजी पर्रीकरांकडची सध्याची खाती त्यांच्या घटकपक्षात विभागण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या सुत्रानी दिलीय यासंबंधात घटक पक्षांशी बोलणी करण्यासाठी केंद्रीय भाजपाचे दोन वरीष्ठ निरिक्षक गोव्यात दाखल झाले असून याबाबतील घटक पक्षांच म्हणण हे निरिक्षक भाजपाच्या वरीष्ठ नेतृत्वाला कळवणार आहेत.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App