facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात नेतृत्वबदल नाही, मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रिकरच राहणार: भाजपा
गोव्यात नेतृत्व बदल होणार नसल्याचे गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदी दुसरा नेता निवडला जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु, तेंडुलकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने नेतृत्वबदलाच्या चर्चांना आता पुर्णविराम मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी पर्रिकर हे अमेरिकेत उपचार करून पुन्हा गोव्यात परतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पर्रिकर हे मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App