facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही
राज्यातील भाजपचे सरकार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे कायम राहिल, असं गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केलं. भाजपचे 3 निरीक्षक संघटनात्मक कामासाठी गोव्यात आले असून बैठकांचे सत्र सुरु झाले असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. पर्रिकर थोड्या दिवसांसाठी उपलब्ध असणार नाहीत. उपचरानंतर पर्रिकर पुन्हा कामाला लागतील असंही तेंडुलकर म्हणाले. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री बदलण्याची सध्या गरज नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही तेंडुलकर यांनी सांगितलं.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App