facebook pixel
chevron_right Top
transparent
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर-Maharashtra Times
जिओने टेलिकॉम क्षेत्रातील पदार्पणला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्राहकांसाठी कॅशबॅक आणि मोफत डेटाची ऑफर जाहीर केली असतानाच एअरटेलनेदेखील ग्राहकांसाठी ऑफर आणली आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर जाहीर केली आहे. जिओच्या प्रवेशानंतर टेलिकॉममध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. एअरटेलने आपली नवीन ऑफर झाली केली असून ४१९ रुपयांमध्ये १.४ जीबी डेटा प्रतिदिन देण्यात येणार आहे. याआधी एअरटेलकडून ग्राहकांसाठी ३९९ आणि ४४८ रुपयांच्या रिचार्जवर ऑफर सुरू आहे. एअरटेलचा ४१९ रुपयांचा रिचार्ज पॅक अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा पॅक ७५ दिवस वैध असणार आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App