facebook pixel
chevron_right Top
transparent
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकरच राहणार
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रकृती अस्वास्थामुळे 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले होते. मनोहर पर्रीकर यांच्याकडे असलेली सर्व खाती अन्य मंत्र्यांकडे देण्याबाबत आणि मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी निवडीबाबत शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्त्यांची ये-जा सुरु होती. यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच यासाठी प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर तेंडुलकर यांनी तूर्तास मुख्यमंत्री बदलाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App