facebook pixel
chevron_right Health
transparent
दाहशामक आहारामुळे आयुर्मान वाढण्याची शक्यता
आहारामध्ये फळे, भाज्या, धान्यापासून तयार केलेले ब्रेड, ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्याने आयुर्मान वाढत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हा अभ्यास जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. दाहशामक पदार्थाचा आहारात समावेश केल्यामुळे आयुर्मान वाढत असून कर्करोग आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. पोलंडमधील वॉरसॉ विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात ४५ ते ८३ या वयोगटातील ६८,२७३ पुरुष आणि महिलांचा समावेश होता. १६ वर्षे या लोकांचा अभ्यास करण्यात आला. जे लोक दाहशामक आहाराचे सेवन करीत होते. त्यांना मृत्यूचा धोका १८ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App