facebook pixel
chevron_right Top
transparent
साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा वाद नेमका काय?
उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सातारा नगरपालिकेने अपिल केलं होतं. यामध्ये त्यांनी साताऱ्यातील मंगळवार तळे, मोती तळे आणि फुटका तलाव यामध्ये विसर्जन करण्यास परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आपला आधीचाच निकाल कायम ठेवला. कोर्टाच्या निकालावर साताऱ्यातील खासदार उदयनराजे आक्रमक झाले. त्यांनी मंगळवार तळं आपल्या मालकीचं असून त्यामध्येच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं, अशी न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेतली. सातारकरांच्या भावनेचा प्रश्न आहे, अशी भूमिका उदयनराजेंनी ठेवली. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सातारा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेश धरणांमध्ये विसर्जन करावे असा निर्णय घेतला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App