facebook pixel
chevron_right Top
transparent
प्रशांत किशोर आता राजकारणाच्या आखाड्यात, 'जेडीयू'त केला प्रवेश
प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर यांनी आज जनता दल धर्मनिरेपक्ष या पक्षात प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या कार्यकारीणीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी जेडीयूचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारत पक्षात प्रवेश केला. त्यामुळं आत्तपर्यंत राजकीय पक्षांसाठी व्युव्हरचना तयार करणारे तज्ज्ञ असलेले प्रशांत किशोर आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळाला. त्यावेळी भाजपने आखलेला निवडणुकीचा प्रचार आक्रमक आणि खूप वेगळा ठरला.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App