facebook pixel
chevron_right Top
transparent
जेएनयूत 'लाल सलाम' ; एन. साई बालाजी अध्यक्षपदी
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी'ला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे डाव्या संघटनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार एन. साई बालाजी यांची विद्यार्थी संघनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय विद्यार्थी संघटनेच्या चारही पदांवर डाव्या संघटनेने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सर्व उमेदवारांचा पराभव झाला. तर 'बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन' तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा 'लाल सलाम'च्या घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App