facebook pixel
chevron_right Top
transparent
गड राखला, जेएनयूत पुन्हा 'लाल सलाम'! 'लेफ्ट युनिटी'ने जिंकल्या सर्व जागा
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी' ला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विद्यार्थी संघाच्या चारही महत्वाच्या पदांवर 'लेफ्ट युनिटी'ने विजय मिळवला असून, डाव्यांचा गड सर करण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी(अभावप) परिषदेच्या पदरी निराशा आली असून सर्व जागांवर त्यांचा पराभव झाला. परिणामी अभावपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. तर, 'बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन' (बापसा) तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा 'लाल सलाम'च्या घोषणा ऐकायला मिळू शकतात.
For the best experience use Awesummly app on your Android phone
Awesummly Chrome Extension Awesummly Android App